Sunday, April 10, 2011

जिवन गाणे

जिवन गाणे जिवन गाणे..

थोडे रडणे, थोडे हसणे,
थोडे प्रेम, थोडे भांडण,
थोडे रुसणे, थोडे रागवणे,
नंतर थोडी समजूत काढणे !!

आपल्या हाती नसतेच,
कुठेतरी जन्मा येणे,
आपल्या हाती नसतेच..
आपले नाव ठेवणे !!

शाळेत जातो आपण,
आपल्या हाती असते शिकणे !
पण असते का आपल्या हाती..
मनापासूनचे शिकवणे ?

तुम्ही काहीही करा ,
तुम्ही कितीही शिका,
असते का तुमच्या हाती,
चार पैशांचे येणे ?

लग्न संसार मूल बाळ,
कदाचित सगळ सुरळीत होते,
रहाते मग तुमच्या हाती,
यातच स्वर्ग सुख वाटणे..!!

विसरा तुम्ही तुमचा भूतकाळ..
आणि विसरा तुमची स्वप्ने..
दुनियेसाठी तुम्ही वेडे,
स्वत:साठी पेडगावचे शहाणे !

नका बघू हो दिवा स्वप्न..
नका होऊ आनंदी दिवाणे..
प्रत्येकाला शेवट असतो..
म्ह्णा तुम्ही हे जीवन गाणे !!


No comments:

Post a Comment